Monday, July 24, 2017

Udhalit Shata Kirana

उधळीत शतकिरणां
उधळीत शतकिरणां उजळीत जनहृदया
नभात आला रे प्रभात रवि उदया
तिमिराची रजनी गेली रे गेली लया

थरकति चंचल जललहरी, नटली सजली वसुंधरा
मधुमय मंगल स्वरलहरी चढल्या भिडल्या दिगंतरा
धिंधिंधिंता धिंधिंधिंता दुंदुभीच्या नादासंगे
अंबराच्या मंदिरात मंद्र वाजे सनई
जय जय बोला, जय जय बोला कोटीकोटी कंठांनि
भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी
रे संपली ती शर्वरी, ये हा रवि या अंबरी

चल करि वंदन नवयुवका, गगनी विलसे नवा रवि
तुजसि न बंधन कधी पथिका, दिसली तुजला दिशा नवी
दिडदिडदारा दिडदिडदारा, प्राण आता झंकारती
तारुण्याच्या सामर्थ्याला कारुण्याची साथ दे
या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे
पौरुषाला विक्रमाचे वैभवाचे हात दे
ही प्रार्थना, ही कामना, ही भावना, ही अर्चना


गीत - वसंत बापट

संगीत - कानू घोष

No comments:

Post a Comment